Tuesday, October 18, 2016

anand post of tft

खादे अँप्लिकेशन किंवा वेबसाइट व्यवस्थित कार्य करत नसेल तर लक्षात ठेवावयाच्या 6 बाबी
सध्या सगळ्या कार्यालयीन बाबी ह्या ऑनलाइन झाल्या आहेत.शिक्षकांना तर सरल, आधार कार्ड व mdm अशा विविध बाबींसाठी ऑनलाइन जाऊन माहिती फिल up करावी लागते आणि कधीतरी ती website किंवा ते अँप नाराज झाल्यासारखे कामच करत नाही आणि आपल्याला कळत नाही काय झाल वेबसाइट ला किंवा अँप ला . कधी कधी तर site किंवा अँप हे नवीन असते व ते काही केल्या चालतच नाही.अँप वेबसाइट ओपन होते पण जसे कार्य करायला हवे तसे काम करत नाही.अशा वेळी त्या अँप च डोकं किंवा😂 स्वतःच डोकं आपटून घेण्याऐवजी, खालील काही गोष्टी तुम्ही करू शकता.
🔑1. तुम्ही नवीन व अपडेटेड version असलेले browser वापरत आहात ना ? बहुतेक वेळा site ह्या ह्याच कारणासाठी व्यवस्थित काम करत नाहीत कारण काही गोष्टी फक्त नवीन version लाच सपोर्ट करतात म्हणून तर होम पेज च्या एकदम खाली कोणता browser वापरावा याचे डिटेल्स दिलेले असतात. जुनेच version वापरणे हे वेब security च्या दृष्टीनेही घातक ठरू शकते. तुम्ही कोणत browser वापरत आहात हे पाहायचे असेल तर खालील site ला भेट द्या  www.WhatBrowser.org
🔑2. तुम्ही browser च्याcookies enabled केल्या आहेत का? काही वेबसाइट्स ह्या cookies enabled असल्या कि उत्तम performance देतात.
🔑3. तुम्ही तुमच्या browser चा पॉप up ब्लॉकर enabled केला आहे का ? बऱ्याच वेबसाइट जशा सरल mdm ह्या लॉग इन साठी पॉप up windows वापरतात.जर हे पॉप up ब्लॉकड असेल तर त्या windows उघडणार नाहीत म्हणून पॉप blocked करू नका.
🔑4. तुम्ही site ipad टॅबलेट किवां chromebook मध्ये तर ओपन करत नाहीत ना ? काही साईट्स फक्त लॅपटॉप अथवा pc मधेच चांगल्या तऱ्हेने ओपन होतात.
🔑5. तुम्ही तुमच्या लॅपटॉप ची ऑपरेटिंग सिस्टिम update केली आहे का? नवीन अँप्स किंवा साईट्स ह्या outdated os वर व्यवस्थित run होत नाहीत त्यासाठी तुम्ही जे device वापरत आहात ते अधिक updated version os वर run करा.
🔑6. तक्रार केल्यावर तुम्ही कधी मेल चे स्पॅम फोल्डर ओपन केले आहे का? जर तुम्ही site च्या प्रशासकाला site व्यवस्थित न चालण्या विषयी तक्रार केली आहे , त्यांनी त्याच सोल्युशन हि पाठवलं असेल पण तो रिप्लाय स्पॅम फोल्डर मध्ये असेल तर म्हणून ते चेक करा तशा सेटिंग करा .
या उपायाबरोबर अजून एक नवीन उपाय नेहमी सांगितला व ऐकला जातो तो म्हणजे " मित्रा बंद करून चालू कर काम करेल😂"
अशाच टिप्स सह पुन्हा भेटू नव्या सदरात अजून नवीन ट्रिकस वाचण्यासाठी या ब्लॉग ला आवर्जून भेट द्या
www.anandanemwad.blogspot.com
🛡लेखन :- आनंद आनेमवाड